मुख्य मजकुराकडे जा
गुरुदास सेवा आश्रमदेणगी द्या

आपली देणगी, आश्रमाची सेवा

आश्रमात राहणारे विद्यार्थी, निराधार ज्येष्ठ आणि सेवक, या आश्रम परिवाराचे रोजचे अन्नदान आणि काळजी: आपल्या देणगीतून ही सेवा अखंड चालते.

गुरूदेव म्हणे तन मन धन हे तुलाच अर्पूनी ॥
— श्री संत गुरूदेव महाराज, भजन १४
१कोणत्या सेवेसाठी?
२रक्कम निवडा

वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचे एका दिवसाचे भोजन

३आपली माहिती (पावतीसाठी)

UPI · कार्ड · नेट बँकिंग, Razorpay द्वारे सुरक्षित. पावती लगेच ई-मेलवर.

आपली देणगी कुठे जाते

आश्रमाच्या आठ सेवा

वाढदिवस, स्मृतिदिन, पुण्यतिथी: त्या दिवशी आश्रमात अन्नदान करा

आपल्या प्रियजनांच्या नावाने आश्रमातील विद्यार्थी, ज्येष्ठ आणि सेवकांसाठी एका दिवसाचे भोजन.

अन्नदान करा

देणगी देण्याचे इतर मार्ग

बँक, UPI किंवा प्रत्यक्ष

बँक व UPI तपशील लवकरच येथे दिले जातील. तोपर्यंत आश्रमाशी संपर्क करा.

बँक किंवा UPI ने थेट दिलेल्या देणगीची पावती कार्यालयातून दिली जाते. कृपया व्यवहाराचा तपशील व्हॉट्सॲप किंवा ई-मेलने पाठवा. WhatsApp संपर्क करा

प्रश्नोत्तरे

देणगीविषयी

माझी देणगी 80G कर सवलतीस पात्र आहे का?

होय, आश्रमाची 80G नोंदणी आहे. पावतीसाठी "80G पावती हवी" निवडा आणि पॅन व पत्ता द्या. आपल्या कर वजावटीसाठी ट्रस्ट दरवर्षी फॉर्म 10BD दाखल करते आणि आपल्याला फॉर्म 10BE देते.

पावती कधी मिळेल?

पेमेंट पूर्ण होताच पावती या पानावर डाउनलोड करता येते आणि ई-मेलवरही पाठवली जाते.

ऑनलाइन देणगी सुरक्षित आहे का?

होय. पेमेंट Razorpay द्वारे होते; आपल्या कार्डची किंवा UPI ची माहिती आश्रमाकडे येत नाही.

परदेशातून देणगी देता येईल का?

सध्या फक्त भारतीय पेमेंट पद्धती (UPI, भारतीय कार्ड, नेट बँकिंग) स्वीकारल्या जातात. परदेशी देणगीसाठी कृपया आश्रमाशी संपर्क करा.

चुकून दोनदा पैसे भरले तर?

आश्रमाशी संपर्क करा; परतावा धोरणानुसार दुसरी रक्कम परत केली जाते.

रोख देणगीबद्दल काय?

₹२,००० पेक्षा जास्त रोख देणगी 80G सवलतीस पात्र नसते. मोठ्या देणगीसाठी UPI, बँक ट्रान्सफर किंवा धनादेश वापरा.

परतावा धोरण →