मुख्य मजकुराकडे जा
गुरुदास सेवा आश्रमदेणगी द्या

परतावा धोरण

मसुदा: ट्रस्टच्या मंजुरीनंतर अंतिम होईल.शेवटचा बदल: ४ ऑक्टोबर, २०२६

देणगी ही स्वेच्छेने दिलेली असल्याने साधारणपणे परत केली जात नाही. मात्र चूक झाली असल्यास आम्ही मदत करतो.

परतावा केव्हा मिळू शकतो

  • चुकीची रक्कम भरली गेली असल्यास.
  • एकाच देणगीचे पैसे दोनदा कापले गेले असल्यास.
  • पेमेंट अयशस्वी झाले पण खात्यातून रक्कम कापली गेली असल्यास.

कसा मागावा

देणगीनंतर ७ दिवसांच्या आत contact@gurudassevaashram.org वर लिहा: नाव, रक्कम, तारीख आणि Razorpay पेमेंट आयडी (पावतीवर असतो).

परतावा कसा मिळतो

मंजुरीनंतर ७ ते १० कामकाजाच्या दिवसांत रक्कम मूळ पेमेंट पद्धतीने परत केली जाते. परत केलेल्या देणगीची 80G पावती रद्द होते.

रोख देणगी

आश्रमात दिलेल्या रोख देणगीबाबत कार्यालयाशी थेट संपर्क साधा.