मुख्य मजकुराकडे जा
गुरुदास सेवा आश्रमदेणगी द्या

वापराच्या अटी

मसुदा: ट्रस्टच्या मंजुरीनंतर अंतिम होईल.शेवटचा बदल: ४ ऑक्टोबर, २०२६

हे संकेतस्थळ अखिल भारतीय गुरुदास सेवा आश्रम, घाटनांदूर, ता. अंबाजोगाई, जि. बीड यांचे आहे. संकेतस्थळ वापरून तुम्ही खालील अटी मान्य करता.

मजकूर आणि छायाचित्रे

श्री संत गुरूदेव महाराजांची भजने, लेखन, छायाचित्रे आणि व्हिडिओ यांचे हक्क आश्रमाकडे आहेत. वैयक्तिक व धार्मिक वापरासाठी ते स्रोताचा उल्लेख करून वाटता येतात; व्यावसायिक वापरासाठी लेखी परवानगी आवश्यक आहे.

देणगी

देणगी पूर्णपणे ऐच्छिक आहे आणि आश्रमाच्या सेवाकार्यासाठी वापरली जाते. परताव्याचे नियम "परतावा धोरण" मध्ये दिले आहेत.

इतर संकेतस्थळांचे दुवे

YouTube, Google Maps अशा इतर संकेतस्थळांच्या मजकुराची जबाबदारी आश्रमाची नाही.

बदल

या अटी वेळोवेळी बदलू शकतात; नवीन आवृत्ती याच पानावर दिली जाईल.

कायदा

या अटींना भारतीय कायदा लागू आहे, आणि वादाचे क्षेत्र बीड जिल्ह्यातील न्यायालये असेल.