Skip to main content
गुरुदास सेवा आश्रमDonate

Bhajan 12 · Gurubodh Anubhav Bhajanavali (Part 2)

The colours of devotion and seva

भक्ती सेवेच्या रंगाची उधळण

By: Shri Sant Gurudev Maharaj

Tune: कधी येशील मन मोहना

This is in Marathi, as Gurudev Maharaj wrote it. An English meaning will be added when the ashram provides one.

Refrain

साजनी शिमगा मी गाते ग । मन माझे मी पाहते ग ॥

सहा जणा मारूनी साजन वरीते ॥साजणी संगे शिमगा मी करिते ॥पाचाच्या संग चवथीला नेते ग ॥॥१॥

गगनात डोह सारा भरला ॥स्वरूपाच्या लाटेत साजन धरला ॥पाहुनी चिन्मय दंग मी होत ग ॥॥२॥

दोन्ही हातानी पिचकारी भरू या ग ॥नव रंगी रंगात जाते ग ॥शुभ्र अभ्रामध्ये झळकते ग ॥॥३॥

शिमगा तुम्ही आता उमगारे ॥पहा जाई शिमगा नच बरे ॥गुरूदेव नरहरी दासा मन देत ग ॥॥४॥

As printed in the book