Skip to main content
गुरुदास सेवा आश्रमDonate

Bhajan 2 · Gurubodh Anubhav Bhajanavali (Part 2)

A prayer to the Guru

गुरूची प्रार्थना

This is in Marathi, as Gurudev Maharaj wrote it. An English meaning will be added when the ashram provides one.

प्रार्थीतो मी गुरूरायाला ॥यावे धर्माच्या तुम्ही साह्या ॥॥१॥

अवनीती अधर्म मोडाया ॥जगी धर्माचे शीड चढाया ॥॥२॥

येऊ द्या तुम्हासी आता दया ॥किर्तनी प्रेम गावयाला ॥॥३॥

आवरूनी तव आपुली माया ॥संत संगी नित्य जडो काया ॥॥४॥

न ऊणे पडो स्वानंदा आनंदा ॥काया वाचा मन लागे पाया ॥॥५॥

आलो नित्य शरण तुला ॥यावे भक्ताच्या मनी ध्याना ॥॥६॥

दूर करो निरसूनी विकल्पा ॥सत्य धर्माशी अभय वरा ॥॥७॥

हेची आस मिळे दासा ॥गुरूदेव प्रभु तुळशी तुला ॥॥८॥

As printed in the book