Skip to main content
गुरुदास सेवा आश्रमDonate

Bhajan 16 · Gurubodh Anubhav Bhajanavali (Part 2)

Wake up, O man

होई सावध रे मनुजा

By: Shri Sant Gurudev Maharaj

Tune: प्रभु हा खेळ दुनियेचा

This is in Marathi, as Gurudev Maharaj wrote it. An English meaning will be added when the ashram provides one.

Refrain

होई सावध रे मनुजा । मस्त कसा तु निजलासी ॥लागली चोट स्वानंद । भोग रे भोग सुखराशी ॥

राजाची झाली पहा रानी । अन् मन दगडाचे झाले ॥ऐकून एकच तो ध्वनी । जाग येऊ दे देखूनी पाणी ॥॥१॥

गाठोडे आशाचे जाळूनी । करीबा राख ही त्याची ॥वैराग्य भस्म चर्चुनी । निज भाक आता साधी ॥॥२॥

जीव मारूनी जिता स्वरूपी । काय नवल सांगु आता की ॥नित्य महा वाक्य मंत्र मनी । खुण निज बीज स्वरूपाची ॥॥३॥

म्हणे गुरूदेव नरहरीशी । जय जय राम प्रभू तुळशी ॥होई सावध तु मनुजा । तुजविण कोण जगा तारी ॥॥४॥

As printed in the book