Skip to main content
गुरुदास सेवा आश्रमDonate

Bhajan 8 · Gurubodh Anubhav Bhajanavali (Part 2)

Longing to meet the Guru

गुरूदेव भेटीची तळमळ

By: Shri Sant Gurudev Maharaj

Tune: रमला हरी कोठे कान्हा

This is in Marathi, as Gurudev Maharaj wrote it. An English meaning will be added when the ashram provides one.

Refrain

येऊ द्या तुम्हाशी हो दया । प्रभू तुळशीराम गुरूराया ॥

धन्य परळी क्षेत्र महाशुर । पर ब्रम्हाचा अवतार ॥दीन दयाळु दाता फार । तोडी काम क्रोध ही माया ॥॥१॥

माझी मुर्ख मती म्हणून । न घडे भजन आणि पूजन ॥तव तुझ्या कृपेविन शीण । जगी नेम धर्म दावाया ॥॥२॥

कलीयुगी म्हणोनी कथिती । नाही देव धर्म नित्य म्हणती ॥विनवितो तळमळ चित्ती । रक्षी ब्रिद लागतो पाया ॥॥३॥

नाही मोक्ष मुक्तीची आस । वैकुंठ आणि कैलास ॥नित्य शरण चरणी वास । गुरूदेव असे नित्य सेवेला ॥॥४॥

As printed in the book