भजन ८ · गुरुबोध अनुभव भजनावली (भाग २)
गुरूदेव भेटीची तळमळ
ध्रुपद
येऊ द्या तुम्हाशी हो दया । प्रभू तुळशीराम गुरूराया ॥
धन्य परळी क्षेत्र महाशुर । पर ब्रम्हाचा अवतार ॥दीन दयाळु दाता फार । तोडी काम क्रोध ही माया ॥॥१॥
माझी मुर्ख मती म्हणून । न घडे भजन आणि पूजन ॥तव तुझ्या कृपेविन शीण । जगी नेम धर्म दावाया ॥॥२॥
कलीयुगी म्हणोनी कथिती । नाही देव धर्म नित्य म्हणती ॥विनवितो तळमळ चित्ती । रक्षी ब्रिद लागतो पाया ॥॥३॥
नाही मोक्ष मुक्तीची आस । वैकुंठ आणि कैलास ॥नित्य शरण चरणी वास । गुरूदेव असे नित्य सेवेला ॥॥४॥
पुस्तकात छापल्याप्रमाणे
इतर भजने
- १गुरू स्तुती
- २गुरूची प्रार्थना
- ३गुरूची विनंती
- ५गुरू सेवेची प्राप्ती
- ६गुरू अर्चना
- ७नाम महिमा
- ९गुरू प्रार्थना
- १०चंचल मनाचे खेळ
- ११गुरू भक्तीतून मोक्षाची प्राप्ती
- १२भक्ती सेवेच्या रंगाची उधळण
- १३तुळशी प्रभू कृपा याचना
- १४माय माऊली एकच असे
- १५जगदाता सुख करता
- १६होई सावध रे मनुजा
- १७साधावि वेळ पलघटी का रे
- १८मरण सर्वाशी आहे गडया रे
- २०मनाची गति सदगतीकडे वळविणे