मुख्य मजकुराकडे जा
गुरुदास सेवा आश्रमदेणगी द्या

भजन १४ · गुरुबोध अनुभव भजनावली (भाग २)

माय माऊली एकच असे

ध्रुपद

माय माऊली एकच असे सर्व मन मंदिरी । ध्यानी ह्रदयी नयनी सर्वा स्थळी तूच राही ॥

जिथे जिथे तु तिथे तिथे ही लागावी दृष्टी ॥अंर्तज्ञान मुक्ती सदा ही बघा पुढे ठेवावी ॥तुझ्या विना मज दुजे नाही संकल्प हेच पाही ॥॥१॥

मौज मानीन हौस फेडीन सदा तुला पाहुनी ॥गुरूदेव म्हणे तन मन धन हे तुलाच अर्पूनी ॥जीव जीवात आहेस तोवरी तुझीच सेवा अवघी ॥॥२॥

पुस्तकात छापल्याप्रमाणे