मुख्य मजकुराकडे जा
गुरुदास सेवा आश्रमदेणगी द्या

भजन २० · गुरुबोध अनुभव भजनावली (भाग २)

मनाची गति सदगतीकडे वळविणे

रचना: श्री संत गुरूदेव महाराज

चाल: प्रभु हा खेळ दुनियेचा

ध्रुपद

अरे मना लाज धर काही ॥लाग नित्य सदगुरू पायी ॥

अती चपळपणा तु करशी ॥जाऊ नये तेथे जाशी ॥उन्मनी भोग सुखराशी ॥तया विण सद्गती नाही ॥॥१॥

जरी असल बोध बुध्दीशी ॥तरी विकल्प का धरशी ॥आवरीता आवरे ना ती जशी ॥चित्त चैतन्याचे सोई ॥॥२॥

सोडी अहंकार हा साचा ॥अव्दैत भजने करावया ॥गुरूदेव नरहरी चरणाशी ॥देई क्षेम सदगुरू पायी ॥॥३॥

पुस्तकात छापल्याप्रमाणे