मुख्य मजकुराकडे जा
गुरुदास सेवा आश्रमदेणगी द्या

भजन ११ · गुरुबोध अनुभव भजनावली (भाग २)

गुरू भक्तीतून मोक्षाची प्राप्ती

रचना: श्री संत गुरूदेव महाराज

चाल: कशी गवळण राधा बावरली

ध्रुपद

कशी मोहनी घातली गुरून ॥मज वेडच गेल भरून ॥

श्रावणात पेरणी केली ॥ती नयना उदया आली ॥मन पवन चित्त दृढ धरूनी ॥॥१॥

ऐकता गजर भुल पडली ॥वीज आकाशात कडकडली ॥मन पवन चित्त एक करूनी ॥॥२॥

नवघास घालीता मुखी ॥दहाव्यात झालो मी सुखी ॥अकराव्या घरा जाओनि ॥॥३॥

नरहरी नाथ गुरू भजनी ॥दास गुरूदेव लागे चरणी ॥माझे मीपण नेले हिरोनी ॥॥४॥

पुस्तकात छापल्याप्रमाणे