मुख्य मजकुराकडे जा
गुरुदास सेवा आश्रमदेणगी द्या

भजन ९ · गुरुबोध अनुभव भजनावली (भाग २)

गुरू प्रार्थना

ध्रुपद

सदगुरू चरणी शरण आलो तोडी बंधना ॥

भावाचीया भेणेभीत । तुज शरण आलो महाराज ॥सत्य सांग तैसे आज । प्रेम भजनी या ॥॥१॥

म्हणूनिया हाची नेम । गुरूनाथ देई क्षेम ॥तयाविण जेथ शम । भक्ती आचरणा ॥॥२॥

निज नामाची ते आवडी । धर्म नित्यची दे जोडी ॥काम क्रोध मोडी खोडी । संभाळ तु दीना ॥॥३॥

गुरूदेव म्हणे नरहरी । गुरूनाथा स्थिर करी ॥अभयवर देऊनी शीरी । उन्मनी मना ॥॥४॥

पुस्तकात छापल्याप्रमाणे