मुख्य मजकुराकडे जा
गुरुदास सेवा आश्रमदेणगी द्या

जय गुरूराया वंदन पाया ॥तुच दीनाशी देई आसरा ॥वेद शास्त्र श्रुती स्तविता ॥अगम्य लीला सर्वेश्वरा ॥॥१॥

तव कृपेविना गावयाशी गुण ॥भजन पूजन कैसेची शोभून ॥वाटते तळमळ पावन दयाळा ॥स्वानंदाचा तुच गाभा ॥॥२॥

सर्व दीन हो आम्हासी ना ॥आणि धर्माशी तू शोभा ॥देऊनिया अभय वरा ॥तव चरणी लीन सदा ॥॥३॥

आलो शरण व्दारी ॥काय श्रीहरी वर्णावी थोरी ॥आसवे काढीले पहाता जरी ॥जो निज ध्यानी उन्मनी तया ॥॥४॥

नेसी आपुल्या निज मंदिरी ॥ज्ञान समुद्री अलक्ष मुद्राकरी ॥उजळीत तव प्रभा करी ॥अभय वर देऊनी भक्ता ना ॥॥५॥

चरणी स्थिर शरण आता ॥तव व्दारी उभा अगणित महिमा ॥न कळे सीमा शेष शिणला ॥तव गुण गाता पांग फिटला ॥॥६॥

जन्म मरण चुकली व्यथा ॥ऐशा परी तव दारी नाथा ॥तिष्ठत भिकारी उभा ॥करी कृपा मजवरी जगन्नाथा ॥॥७॥

देऊनि परेहुनी परते हाता ॥आयते कैसे सापडले आम्हा ॥रेड्या मुखी वेद बोलला ॥तव तुझ्या कृपा बोधा ॥॥८॥

फिरता गिरकी आम्हा ॥नच वाटे लाज शरमा ॥नको चोरू पान्हा संभाळा ॥पामराशी तुच संभाळा ॥॥९॥

करी गुरूदेव तोबा तोबा ॥अभय देऊनी संसारी तरता ॥तुज वाचूनी एक गुरूनाथा ॥घेई घेई चरणी तव आता ॥॥१०॥

पुस्तकात छापल्याप्रमाणे