मुख्य मजकुराकडे जा
गुरुदास सेवा आश्रमदेणगी द्या

भजन ६ · गुरुबोध अनुभव भजनावली (भाग २)

गुरू अर्चना

रचना: श्री संत गुरूदेव महाराज

चाल: माझा होशील का

ध्रुपद

नाथ तुळशी भगवंता ॥

दीन दयाळा करूणा तुजशी ॥शांत करी रे मम वृत्तीशी ॥निज दुःखाच्या आठवणीने ॥अश्रू ये तुळशीनाथा ॥॥१॥

भक्ताची तु माय माऊली ॥संकट येता तुझी सावली ॥भक्त प्रल्हादे हाक मारता ॥येशी आता तु तुळशीनाथा ॥॥२॥

धाव पाव रे तारि मजला ॥दुःख झाले देह शीणला ॥गुरूदेवदास तुला विनवी सखया ॥देवा तु दाता तुळशीनाथा ॥॥३॥

पुस्तकात छापल्याप्रमाणे