मुख्य मजकुराकडे जा
गुरुदास सेवा आश्रमदेणगी द्या

भजन १३ · गुरुबोध अनुभव भजनावली (भाग २)

तुळशी प्रभू कृपा याचना

रचना: श्री संत गुरूदेव महाराज

चाल: प्रभू हा खेळ दुनियेचा

ध्रुपद

तुळशी देवा शरण आलो तुज मी । मजला संसारी तारी ॥

तुझ्या कृपेविना जीव तरेना । करी मज तुच कृपा आता ॥दीन पामर तारी रे प्राण्या । तुच दीन अनाथाशी ॥॥१॥

तव प्रेम भरले अंतरा । प्राण दाटुनी गहीवरला ॥घडावी म्हणोनी तुझी सेवा । पाव रे प्रेमा तु तत्वता ही ॥॥२॥

अमर महिमा निज स्वरूपाचा । प्रगट भुमीवरी कराया ॥मुक्त होऊदे सारे प्राण्या । तरू दे त्यांना सुख सागरी ॥॥३॥

भाव भुकेल्या भक्त वचना । करीतसे गुरूदेव ही प्रार्थना ॥भजनी आनंद निज स्वरूपाचा । आनंद अवघा अंतरी ॥॥४॥

पुस्तकात छापल्याप्रमाणे