मुख्य मजकुराकडे जा
गुरुदास सेवा आश्रमदेणगी द्या

भजन ७ · गुरुबोध अनुभव भजनावली (भाग २)

नाम महिमा

रचना: श्री संत गुरूदेव महाराज

चाल: मंगल मय नाम तुझे

ध्रुपद

शुभ मंगल नाम असे तुळशी प्रभुचे ॥

त्यागुनीया काम क्रोध । प्रेम भावे मोक्ष छंद ॥तया नाचे स्वछंद । अभयवर घेई त्याचे ॥॥१॥

नको तिर्थ व्रद तप । योग याग करणे जप ॥निश्चल निर्धारी माप । स्वानुभवाचे ॥॥२॥

भला वेळ लाभला । न घालऊ उनी वाया ॥सर्व सच्चितानंद पूर्ण । महा वाक्य तयाचे ॥॥३॥

भिकारी तिष्ठत उभा, असे । त्यासी कोण ओळखीते ॥म्हणे नरहरी गुरूदेवा । धर्म वदो वाचे ॥॥४॥

पुस्तकात छापल्याप्रमाणे