मुख्य मजकुराकडे जा
गुरुदास सेवा आश्रमदेणगी द्या

भजन १० · गुरुबोध अनुभव भजनावली (भाग २)

चंचल मनाचे खेळ

रचना: श्री संत गुरूदेव महाराज

चाल: प्रभु हा खेळ दुनियेचा

ध्रुपद

मन हे ना आवरे आवरिता ॥आलो शरण तुला गुरूनाथा ॥

जाऊ नये तेथे जाते । कल्पु नये ते कल्पीते ॥सदा भोवे विषया भवते । कोणा सांगु मी आता ॥॥१॥

झाले इंद्रिया आधीन । ना जाने माय आणि भगिन ॥सदा क्रोध युक्त होऊन । निंदी साधु आणि संता ॥॥२॥

बोले एक चाले एक । करी तसे संकल्प अनेक ॥नट बनले असे माईक । करी धरी धर्म दाता ॥॥३॥

नाही मोक्ष मुक्तीचा हेवा । देई मज प्रेम नित्य नवा ॥वय काळ खातसे बघा । नरहरी घ्या गुरूदेवाशी हाता ॥॥४॥

पुस्तकात छापल्याप्रमाणे