भजन १५ · गुरुबोध अनुभव भजनावली (भाग २)
जगदाता सुख करता
ध्रुपद
जगदाता सुख करता खरा । तु प्रभु तुळशी नाथा ॥जगी असशी साक्षी बघा । प्रभु महा भाग्य विधाता ॥
अंत अनंता चरा चरा । साक्षी असशी बघा ॥स्वतः आपण दुःख सोशीता । पर जीवाशी रक्षीता ॥देई रे सखया आम्हा । तुझे ते दुःख जगन्नाथा ॥॥१॥
देवाचा देव ही असूनी । आला या प्रथ्वीवरती ॥करूणामय उपकार किती । तुझे रे आम्हावरी ॥विशुध्द ज्ञानाचा प्रकाश ह्रदयी । झाली असे ज्योती आता ॥॥२॥
अभय धडा पूर्ण करी । करूणा पुर्ण दिली ख्याती ॥करूनी थोर कार्य या जगी । तु सर्व नाथ व्यापी ॥गुरूदेव म्हणे देवाधि देवा । करी तूच ही पूर्तता ॥॥३॥
पुस्तकात छापल्याप्रमाणे
इतर भजने
- १गुरू स्तुती
- २गुरूची प्रार्थना
- ३गुरूची विनंती
- ५गुरू सेवेची प्राप्ती
- ६गुरू अर्चना
- ७नाम महिमा
- ८गुरूदेव भेटीची तळमळ
- ९गुरू प्रार्थना
- १०चंचल मनाचे खेळ
- ११गुरू भक्तीतून मोक्षाची प्राप्ती
- १२भक्ती सेवेच्या रंगाची उधळण
- १३तुळशी प्रभू कृपा याचना
- १४माय माऊली एकच असे
- १६होई सावध रे मनुजा
- १७साधावि वेळ पलघटी का रे
- १८मरण सर्वाशी आहे गडया रे
- २०मनाची गति सदगतीकडे वळविणे