Skip to main content
गुरुदास सेवा आश्रमDonate

Bhajan 5 · Gurubodh Anubhav Bhajanavali (Part 2)

The blessing of serving the Guru

गुरू सेवेची प्राप्ती

By: Shri Sant Gurudev Maharaj

Tune: ओ दूर जानेवाले

This is in Marathi, as Gurudev Maharaj wrote it. An English meaning will be added when the ashram provides one.

Refrain

माझ्या मनाची आशा । सुखी संतोषा ॥माया मोहादि कांक्षा । तुळशी प्रभुच्या दासा ॥

माझ्याच सुभाग्याने । प्रारब्ध संचिताने ॥संतोषाशी योगाने । घडली गुरूची सेवा ॥॥१॥

देवाधि देवा म्हणूनी । ब्रम्हची ज्याचे चरणी ॥साक्षी निराभिमानी । धरली गुरूनि छाया ॥॥२॥

वर्णावी काय थोरी । उपकारा पार नाही ॥म्हणे गुरूदेव मना ठायी । बसला श्री गुरूराया ॥॥३॥

As printed in the book